सरबज्योत सिंहला 5 ऑगस्टपर्यंत सीबीआय रिमांड

August 1, 2009 9:11 AM0 commentsViews:

1 ऑगस्टनाशिकमधल्या घंटागाडी लाच प्रकरणी बुटासिंह यांचा मुलगा सरबज्योत सिंह याने गुन्हा कबुल केला आहे. आता बुटासिंह यांचीही सीबीआय चौकशी होण्याची शक्यता आहे. बुटासिंह यांच्या लँडलाईन नंबरवरुन याप्रकरणातील एका आरोपीला वारंवार फोन केले गेल्याचे रेकॉर्ड सीबीआयच्या हाती लागले. याप्रकरणी सरबज्योत सिंह आणि इतर तीन आरोपींना 5 ऑगस्टपर्यंत सीबीआय रिमांड देण्यात आली आहे. सबरज्योतला सीबीआयनं दिल्लीत अटक केली होती. नाशिकमधल्या घंटागाडी घोटाळा प्रकरणातला कंत्राटदार रामराव पाटील याच्याकडून 1 कोटींची लाच घेताना सीबीआयनं सरबज्योत सिंहला अटक केली होती. ऍट्रॉसिटी दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप सरबज्योतसिंहवर ठेवण्यात आला आहे. केंद्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष तसंच माजी केंद्रीय गृहमंत्री बुटासिंह यांचा सरबज्योतसिंह हा मुलगा आहे.

close