मढवीचा अटकपूर्व जामीन नाकारला

August 3, 2009 11:52 AM0 commentsViews: 4

3 ऑगस्टनवी मुंबईचा फरार नगरसेवक एम. के. मढवीचा अटकपूर्व जामीन मुंबई हायकोर्टाने नाकारला आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन हायकोर्टाने हा जामीन नाकारला आहे. मढवी हा नवी मुंबईतल्या अतिक्रमण घोटाळ्यातला प्रमुख आरोपी आहे. याप्रकरणी जर मढवीला जामीन दिला तर तो पुरावे नष्ट करू शकतो. म्हणून त्याला जामीन देता येणार नाही. असं सुनावणीच्या वेळी हायकोर्टात न्यायाधीश देशपांडे यांनी म्हटलं आहे. जामीन नाकारल्याने मढवीविरोधात वेगाने तपास सुरू झाल्याने त्याच्या अटकेची शक्यता वाढली आहे.

close