मागण्या मान्य झाल्याने राज्य सरकारी कर्मचा-यांची संपाआधी माघार

August 3, 2009 12:01 PM0 commentsViews: 5

3 ऑगस्टराज्य सरकारी कर्मचा-यांच्या मागण्या सरकारनं मान्य केल्यात. त्यामुळं संघटनांनी आपला संप मागे घेतलाय. सरकारीकर्मचा•यांना सहावा वेतन आयोग लागू झाला. त्यानुसार त्यांना घरभाडं आणि वाहतूक भत्ता हवा होता. ती मागणी सरकारनं मंजूर केली आहे. येत्या 4 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा 22 लाख सरकारी कर्मचा•यांनी दिला होता.केंद्राप्रमाणेच एचआरऐ आणि टिएडीए लागु करावेत अशी या कर्मचारी आणि अधिका•यांची प्रमुख मागणी होती. त्याचबरोबर महिलांची 180 दिवसांची प्रसुती रजेसंदर्भातली मागणीही मंजूर करण्यात आली. गॅ्रज्युटीची मर्यादा 10 लाखापर्यंत वाढवावी या मागणीवर ही मर्यादा आता सहा लाखांपर्यंत करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2010ऐवजी हा टिएडीए आत्ताच मिळाला असता तर अजून आनंद झाला असता अशी प्रतिक्रियाही या कर्मचा•यांनी व्यक्त केली.

close