इंडियन सुपर लीगचा आज रंगणार थरार

December 20, 2014 3:22 PM0 commentsViews:

isl_final20 डिसेंबर : इंडियन सुपर लीग आता अगदी अंतिम टप्प्यात आहे. आज आयएसएलच्या फायनलचा थरार रंगतोय. खरं तर इंडियन सुपर लीगच्या या पहिल्या सीझनचं जेतेपद कोणाकडे जातं हे आज महत्वाचं नाहीये. पण भारतीय फुटबॉलला या लीगनं एक वेगळी ओळख निर्माण करुन दिलीये हे नक्की..

भारतीय फुटबॉलला या क्षणानं जागतिक पातळीवर एक उभारी दिली. अनेक वर्षांपासून ज्या क्षणाची वाट भारतीय फुटबॉल फॅन्स बघत होते, तो क्षण अखेर आला. 12 ऑक्टोबरला कोलकात्यात रंगलेल्या आयएसएलच्या या रंगारंग उद्घाटन सोहळ्यानं भारतीय फॅन्सना त्यांच्या हक्काची फुटबॉल लीग मिळाली.

सेलिब्रिटी मालकांमुळे प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर ग्राऊंड्सवर आकर्षित झाले. पण अप्रतिम खेळानं फॅन्सना खर्‍या अर्थानं मंत्रमुग्ध केलं. अगदी पहिल्यांदाच डेल पिएरो, डेव्हिड ट्रेझगे, मार्को माराझ्झी, रॉबर्ट पिरेझ यांच्यासारख्या लेजंड्सचा खेळ भारतीय फॅन्सना बघायला मिळाला आणि त्यांच्या संगतीत भारतीय खेळाडूंचा खेळही बहरला. आएसएलच्या आगमनानं भारतीय फुटबॉलचा चेहरा मोहराच बदलला.

गेल्या दोन महिन्यांमधल्या या कमालीच्या प्रवासात बंगाल, केरळ, गोव्या या फुटबॉल हब्समध्येच नाही तर गुवाहाटीसारख्या शहरांतही फुटबॉलचं वेड अगदी ओसंडून वाहताना पाहायला मिळालं. या स्पर्धेनं काही रेकॉर्ड्स मोडलेत तर काही नव्यानं प्रस्थापित केलेत.

- स्टेडियममध्ये आशियातील सर्वाधिक प्रेक्षकसंख्या स्पर्धेला मिळाली
– प्रत्येक मॅचला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला
– EPL, La Liga नंतर जगातील पाचव्या क्रमांकाची प्रेक्षकसंख्या मिळाली
– प्रेक्षकसंख्येच्या आधारे वर्ल्ड स्पोर्ट्समधील 11 वी लोकप्रिय स्पर्धा ठरली

अनेक दशकं भारतीय फुटबॉल हा कुंभकर्णासारखा झोपला होता. पण अखेर इंडियन सुपर लीगच्या आगमनानं हा कुंभकर्ण आता झोपेतून जागा झालाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close