एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी

December 20, 2014 5:51 PM0 commentsViews:

eknath shinde23420 डिसेंबर : शिवसेनेचे नेते आणि एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे शिंदे यांची सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

नागपुरमध्ये रवी भवन इथं असताना त्यांना ही धमकी देण्यात आली आहे. या फोननंतर एकनाथ शिंदे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केलीये. शुक्रवारी म्हणजे काल संध्याकाळी 5.54 मिनिटांनी 12 आकडी नंबरवरून शिंदे यांना फोन आला.

त्यांनी फोन उचलताच फोनवरच्या व्यक्तीनं शिंदे यांना धमकावायला सुरुवात केली. त्यानंतर नागपूरचे पोलीस आयुक्त के.के. पाठक यांना फोनवरून हा सगळा प्रकार सांगितलाय.शिंदे यांच्या तक्राराची दखल घेऊन तातडीने त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आलीये.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close