या कलाकारांचे होते कमाईचे वर्ष !

December 20, 2014 8:22 PM0 commentsViews:

फोर्ब्स इंडियाने काही दिवसांपूर्वीच यावर्षी सर्वात जास्त कमवणार्‍या व्यक्तींची यादी जाहीर केली होती. 100 सेलिब्रिटींची ही यादी केवळ कमाईवर नाही तर चाहत्यांच्या पसंतीवरही तयार करण्यात आली आहे. यात सर्वांना मागे टाकत दबंग खान अर्थात सलमान खानने बाजी मारली आहे. सलमानच्या चाहत्यांची यादीही बरीच मोठी आहे. सलमान खानची या वर्षाची कमाई सर्वाधिक म्हणजे तब्बल 244 कोटी इतकी आहे.

बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन हा दुसर्‍या क्रमांकावर आहे. बच्चन यांची कमाई साधारणपणे 196.75 कोटी इतकी आहे. तर शाहरूख खान हा गेल्या वर्षी फोर्ब्स इंडियाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र यावर्षी त्याची लोकप्रियता घसरून आता पहिल्या क्रमांकावरून तो तिसर्‍या क्रमांकावर पोहचलाय. शाहरुखची यावर्षाची एकूण कमाई 202.40 कोटी इतकी आहे. चौथ्या क्रमांकावर आहे टीम इंडियाचा कॅप्टन…महेंद्रसिंग धोणी…अगदी लहान मुलांमध्येही लोकप्रिय असलेल्या कॅप्टन धोणीची कमाई 141.80 कोटी आहे. खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार ने 172 कोटी रूपयांची कमाई करत तो पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याच्यापाठोपाठ क्रिकेटर विराट कोहली या वर्षी अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. 58.43 कोटीची कमाई करत विराट सहाव्या नंबरवर पोहचला आहे.

तर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सातव्या क्रमांकावर असून त्याने 80.47 कोटींची कमाई केलीये. विशेष म्हणजे फोर्ब्स इंडियाच्या यादीत टॉप टेनमध्ये स्थान पटकावणारी दीपिका पदुकोण एकमेव अभिनेत्री आहे. तिने या वर्षात तब्बल 67.20 करोड रुपयांची कमाई करत आठवे स्थान पटकावले आहे. क्रिश फेम अभिनेता ह्रतिक रोशनची जादू याही वर्षी कायम राहिली. ह्रतिकने 85 कोटींची कमाई करत नववे स्थान मिळवले आहे. तर सर्वात शेवटी पण आज पर्यंत कायम पहिला होण्याचा मान मिळवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मात्र दहाव्या स्थानावर फेकला गेलाय. सचिनची यावर्षीची एकूण कमाई ही 59.54 कोटी इतकी झाली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close