H1N1मुळे पुण्यातल्या 14 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

August 3, 2009 3:55 PM0 commentsViews: 7

3 ऑगस्टपुण्यातल्या 14 वर्षाच्या एका मुलीचा सोमवारी संध्याकाळी पाच सुमारास H1N1ची लागण झाल्यामुळे मृत्यू झालाय. H1N1मुळे झालेला देशातला पहिला मृत्यू आहे. या मुलीला जहाँगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिची तब्येत गेल्या दोन आठवड्यांपासून बरी नव्हती. सुरुवातीला कित्येक दिवस तिला साध्या व्हायरल इन्फेक्शनसाठी औषधं देण्यात आली होती. या मुलीला वेळीच योग्य ट्रीटमेंट मिळाली असती, तर तिचा जीव वाचवता आला असता, असं केंद्रीय आरोग्य सचिव नरेश दयाल यांनी दिल्लीत म्हटलंय. पुण्यात h1n1च्या रुग्णांची संख्या शंभरपर्यंत पोचली आहे. तर देशात हा आकडा साडे पाचशेच्या वर गेलाय.

close