जहांगिर हॉस्पिटलवर खटला भरणार

August 4, 2009 10:51 AM0 commentsViews: 4

पुणे 4 ऑगस्ट पुण्यात सोमवारी रिदा शेखचा H1N1 ने मृत्यु झाला होता. रिदाला सुरवातीला न्युमोनिआवर इलाज चालू होता. त्यानंतर तिला H1N1ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. रिदाच्या मृत्युला जहांगिर हॉस्पिटलचं जबाबदार असल्याचा आरोप मंगळवारी तिच्या पालकांनी पत्रकार परिषद घेउन केला आहे. तसेच जहांगिर हॉस्पिटलवर ते खटला देखील दाखल करणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील रिदाच्या मृत्युला जहांगिर हॉस्पिटलचं जबाबदार असल्याचं सांगितलं आहे.

close