नवी मुंबईत रिक्षाचालकांचा संप

August 4, 2009 10:56 AM0 commentsViews: 3

नवी मुंबई 4 ऑगस्टसीएनजी पंपांची संख्या वाढवावी या मागणीसाठी नवी मुंबईतील रिक्षा चालक आज संपावर गेले आहेत. सीएनजी पंपांची संख्या कमी असल्यानं रिक्षाचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. इंधनाअभावी व्यवसायावरही त्याचा परिणाम होतो. त्यासाठीच रिक्षाचालकांनी संप पुकारला आहे. या संपाचा फटका मात्र सर्व सामान्य नागरिक, शाळकरी मुलांना बसतो आहे.

close