दोन दिवसात ‘पीके’ची 50 कोटींची कमाई

December 21, 2014 7:20 PM0 commentsViews:

pk15-oct23

21 डिसेंबर :  मिस्टर परफेक्टशनिस्ट आमिर खानच्या ‘पीके’ने केवळ दोन दिवसात 50 कोटींपेक्षाही अधिक गल्ला जमावला आहे.  राजकुमार हिराणी दिग्दर्शित आणि विधू विनोद चोप्राची निर्मिती असलेला ‘पीके’ शुक्रवारी प्रदर्शित झाला. ‘पीके’ हा या वर्षातील चौथा चित्रपट आहे ज्याने दोन दिवसात तिकीट बारीवर 50 कोटींपेक्षाही अधिक कमाई केली.

पहिल्याच दिवशी ‘पीके’ने 26 कोटींच्यावर कमाई केली होती. दोन दिवसात या चित्रपटाने जवळपास 55 कोटी कमावले आहेत. या चित्रपटाची सर्वच स्तरातून वाह..वा! केली जात असून फिल्म समीक्षकांनी ‘पीके’चं भरभरून कौतुक केलं आहे. शिवाय या सिनेमाची माऊथ पब्लिसिटीही भरपूर होत आहे. त्यामुळे ‘पीके’साठी रांगा लागल्या आहेत. त्यात आज रविवार असल्याने ‘पीके’च्या कमाईत आणखी भर पडणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close