विनोद कांबळी नव्या इनिंगमध्ये करणार पहिलं राजकीय आंदोलन

August 5, 2009 9:07 AM0 commentsViews: 37

5 ऑगस्टविनोद कांबळी आपल्या नव्या इनिंगला सुरूवात करतो आहे. आमदार कपिल पाटील यांच्या लोकभारती या राजकीय पक्षात काही महिन्यापुर्वी विनोद कांबळीने प्रवेश केला होता. त्यानंतर पहिल्यांदाच तो राजकीय आंदोलनात सहभागी होणार आहे. मुंबईतील मैदानांचा आणि डम्पिंग ग्राऊंडच्या प्रश्नांसाठी विनोद कांबळी कपिल पाटील यांच्यासह मनपा आयुक्त जयराज फाटक यांची बुधवारी दुपारी भेट घेणार आहे. कांजुरमार्ग-भांडूप परिसरातील खेळांच्या मैदानांच्या दुरवस्थेबाबतही तो यावेळी आयुक्तांशी चर्चा करणार आहे.

close