राज्यात आडत व्यापार्‍यांचा आजपासून बंद

December 22, 2014 9:36 AM0 commentsViews:

04TY_SMALL_ONIONS_1709114g

22 डिसेंबर :  कृषी उप्नन्न बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांऐवजी व्यापार्‍याकडून आडत घेतली जावी, असा ऐतिहासिक निर्णय पणन खात्याने घेतला आहे. मात्र यामुळे नाशकात व्यापारी संतप्त झालेत.

राज्यभरातल्या आडत पद्धतीवर आणलेल्या बंदीचा निषेध म्हणून आजपासून नाशिक, धुळ्यातल्या व्यापार्‍यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात सकाळी 10 वाजता व्यापार्‍यांची नाशकात बैठक होणार आहे. तर नवी मुंबईतही व्यापारी आक्रमक झाले आहेत. सरकारच्या निर्णयावर भूमिका घेण्यासाठी आज 11 वाजता व्यापार्‍यांनी बैठक बोलवली केली आहे.

दरम्यान, नाशकातील सर्व व्यापार्‍यांनी आजपासून भाजीपाला आणि धान्यांच्या लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजीपाल्यासह अन्नधान्याचे सर्व व्यापार उद्या बंद असणार आहे. याचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसणार आहे. तसंच कांद्याच्या पुरवठ्यावरही याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

आडत बंद करण्याचं परिपत्रक कालच पणन संचालकांनी काढलं आहे. भाजप सरकारचा हा मोठा निर्णय समजला जातो. शेतकर्‍यांना स्वत:चा माल विकताना 3 ते 6 टक्के आडत म्हणजेच दलाली द्यावी लागायची. वर्षभरात जवळपास 1500 कोटी रुपयांची आडत शेतकर्‍यांकडून वसूल केली जायची. आता ही पद्धतच बंद होणार असल्यानं आडत वसुलीला चाप बसणार आहे आणि त्यामुळे या निर्णयामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पण, आडते मात्र नाराज झाले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली आडत पद्धत पुन्हा सुरू करावी अशी मागणी व्यापार्‍यांनी लावून धरली आहे. या मागणीसाठी व्यापार्‍यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. यामुळे सरकार नेमका काय निर्णय घेत हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close