पुण्यात इमारतीला आग; वृद्ध महिलेचा मृत्यू

December 22, 2014 9:51 AM0 commentsViews:

Pune Fire

22 डिसेंबर :  पुण्यातील कोथरूड परिसरात एका बंगल्याला आग लागली होती. महात्मा सोसायटीत ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून एका तरूणीला वाचवण्यात यश आले आहे. ही आग सकाळी 7 च्या सुमारास लागली.

फायरब्रिगेडच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिस पुढील तपास करत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close