वीरभद्र सिंग यांच्या विरोधात FIR

August 5, 2009 9:26 AM0 commentsViews: 2

5 ऑगस्ट मनमोहन सिंग मंत्रिमंडळातले कॅबिनेट मंत्री वीरभद्र सिंग एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकले आहेत. त्यांच्याविरुद्ध मंगळवारी हिमाचल प्रदेशात FIR दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय पोलाद मंत्री वीरभद्र सिंग हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत. 2007 साली मे महिन्यात त्यांनी राजकीय विरोधकांनी एक सीडी प्रसिद्ध केली होती. या सीडीमध्ये वीरभद्र सिंग आणि त्यांच्या पत्नी एका IAS अधिका•यांशी फोनवरून पैशाविषयी बोलताना दाखवले आहेत. ही सीडी तपासणीसाठी चंदीगढमधल्या प्रयोगशाळेत पाठवली होती, जिथे सीडीमधला आवाज हा वीरभद्र आणि त्यांच्या पत्नीचाच असल्याचं सिद्ध झालं आहे. पण, हा मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असं वीरभद्र सिंग यांचं म्हणणं आहे.

close