गणेश नाईकांसह राष्ट्रवादीचे पाच आजी-माजी आमदार भाजपच्या वाटेवर?

December 22, 2014 2:19 PM2 commentsViews:

Ganesh naik

22 डिसेंबर :  नवी मुंबईत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. गणेश नाईकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आजी-माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.

ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण महापालिकांमधले 162 नगरसेवकही नाईकांच्या संपर्कात असल्याचंही कळतं. गणेश नाईक यांना मंत्रिपद हवंय, अशी माहिती सूत्रांकडून मिळतं आहे. तसंच,नाईकांना सिडकोचं अध्यक्षपदही हवं आहे. या चर्चेनंतर आता गणेश नाईकांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू राष्ट्रवादीने सुरू केले आहेत. शरद पवारांनी गणेश नाईकांशी फोनवरून संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी आयबीएन लोकमतला दिली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Deepak

    jara navin batami dya ibn lokmat…. 15 divas jhale tich batami sarv jan det ahat.
    ugich nusatya afava pasarau naka. pakshantar karatil teva dya batami , ugich fakt breaking news sathi fakt afava pasarau naka.

  • सचिन घरत

    श्री गणेश नाईक भाजपा मध्ये जाणारच नाहीत हि काळ्या दगडावरची रेघ आहे , तुम्ही पत्रकार काहीही लिहा, परंतु आम्ही नागरिक म्हणून सांगतो ते भाजपा मध्ये जावूच शकत नाहीत , गेले तर शिवसेनेत जातील परंतु भाजपा मध्ये जाणार नाहीत, भाजपा मध्ये जर गेले तर त्यांना स्थानिक पातळीवर काय अधिकार मिळतील ? ह्याचा सुधा विचार करा , त्यापेक्षा त्यांना शिवसेनेत जास्त अधिकार miltil

close