पुण्यात दहा वर्षांच्या मुलाची आत्महत्या

December 22, 2014 2:38 PM0 commentsViews:

images22 डिसेंबर :  पालकांनी जर्किन घेऊन दिले नाही म्हणून 10 वर्षांच्या मुलाने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. धनकवडी परिसरात रविवारी रात्री घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. आदित्य सुनिल पिसाळ असे गळफास घेतलेल्या मुलाचे नाव आहे.

काल रात्री 10 च्या सुमारास घरातील कॉम्पूटर टेबलवर उभा राहून त्याने फॅनला ओढणी बांधून गळफास घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, एवढ्या शुल्लक कारणामुळे चिमुरड्याने जीवन संपवल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस आत्महत्येच्या कारणासोबत इतर काही घातपात आहे का याची चौकशी करीत आहेत. दरम्यान, आज सकाळी संबंधित मुलांवर धनकवडीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close