लोकसभेत शिक्षण हक्क विधेयक मंजूर

August 5, 2009 9:38 AM0 commentsViews: 3

5 ऑगस्टलोकसभेत मंगळवारी एक ऐतिहासिक विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. यानुसार चौदा वर्षांपर्यंतच्या मुलांना शिक्षण मोफत आणि सक्तीचं होणार आहे. सहा ते चौदा वर्षांपर्यंतची मुलं या कायद्यांतर्गत येतील. युपीए सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमातलं हे एक महत्त्वांकाक्षी विधेयक आहे. तसंच खाजगी शाळांमध्येही आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकांना पंचवीस टक्के आरक्षण देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. हे विधेयक म्हणजे नव्या युगाची सुरुवात असल्याचं मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी लोकसभेत सांगितलं.

close