2014मध्ये या नव्या चेहर्‍यांची एंट्री

December 22, 2014 6:04 PM0 commentsViews:

यावर्षी बॉलिवूडमध्ये अनेक नव्या चेहर्‍यांनी एंट्री केली. यांत काहींचे चित्रपट फ्लॉप ठरले तर काहींचे हिट.. पाहुयात याचीच ही झलक…
अभिनेते जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफनेही ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाय ठेवला. या चित्रपटांत त्याने केलेल्या नृत्याची सर्वच स्तरांतून प्रशंसाही झाली. तर टायगरसोबतच कृती शॅनन या अभिनेत्रीने हिरोपंती चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.

फवाद खान या अभिनेत्याने ‘खुबसूरत’ या चित्रपटापासून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. पहिल्याच चित्रपटात फवादला सोनम कपूर सोबत काम करण्याची संधी मिळाली. फवादने या चित्रपटात प्रेक्षकांना निराश केलं नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला खरा पण फवादच्या कामाचं कौतुक झालं.

इमरान अब्बास नकवी या अभिनेत्याने पहिल्याच चित्रपटात बॉलिवडूची हॉटेट्स अभिनेत्री बिपाशा बासूसोबत ‘क्रियेचर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. निहारीका सिंगने यावर्षी मिस लवलीमध्ये काम केले. निहारीका हीने मिस इंडियाचा किताबही जिंकलेला आहे. तर डेजीने ‘जय हो’ या चित्रपटात सलमान खानसोबत काम करत बॉलिवूड करिअरची सुरुवात केली.

सिटी लाईटस् या चित्रपटाद्वारे पत्रलेख, ताहिर राज भसीन ने ‘वन बाय टू’ या चित्रपटाने बॉलिवूड करियरची सुरुवात केली. वन बाय टू या चित्रपटातील उत्कृष्ठ अभिनयानंतर तो राणी मुखर्जीच्या मर्दानी या चित्रपटातही दिसला. तर टॉपची अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहीण मन्नरा चोपडा ‘जिद्द’ या आपल्या पहिल्या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले आहे. तर पार्थ या छोट्या मुलानेही ‘भूतनाथ रिटर्नस्’ या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पाय ठेवला. पहिल्याच चित्रपटात बॉलिवूड बादशाह अमिताभ बच्चन सारख्या दिग्गज कलाकारासोबत काम करायला मिळाल्यामुळे पार्थनेही आपली एक वेगळीच छाप निर्माण केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close