H1N1 बाबत घ्यायची खबरदारी

August 5, 2009 10:42 AM0 commentsViews: 2

H1N1 ला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे :सर्व संशयित केसेस मान्यताप्राप्त हॉस्पिटलमध्येच तपासले जातील. H1N1 ची लक्षणं दिसल्यास फक्त सरकारी हॉस्पिटलमध्येच तपासणी करुन घ्यावी.केवळ तीव्र लक्षणं दिसणा-यांनाच वेगळं काढलं जाईल. सौम्य लक्षणं दिसणा-या रुग्णांना वेगळं ठेवण्यात येणार नाही. रुग्णांना घरात वेगळं ठेवण्याचे नियमही सरकारनं सोपे केलेत. घरात वेगळं ठेवण्यात येणा-या रुग्णांना त्यांच्या आरोग्याचा तपशील द्यावा लागेल. महत्त्वाचं म्हणजे परदेशातून येणा-या व्यक्तींसाठी या गाईडलाईन्स लागू नाहीत. रिदा शेखच्या मृत्यूनंतर H1N1च्या साथीचा प्रसार आणि त्याबाबत घ्यायची काळजी हा मुद्दा प्रामुख्याने समोर आला आहे. तेव्हा संसर्ग टाळण्यासाठी पुढील काळजी घ्या. संसर्ग झालेल्या भागात शक्यतो प्रवास टाळाआजारी असल्यास मोठ्या गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळाहातांची स्वच्छता ठेवण्यासाठी हात नेहमी स्वच्छ धुवावेतफ्लूच्या ताप आणि खोकल्यासारख्या लक्षणांवर व्यवस्थित लक्ष ठेवाशंका आल्यास सरकारी हॉस्पिटलमध्ये किंवा अधिकृत डॉक्टरांना तातडीने संपर्क करासंसर्ग झालेल्यांनी सार्वजनिक जागा कटाक्षानं टाळाव्यात, त्यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही. त्यांच्या शिंकण्या-खोकण्यातूनच H1N1चा प्रसार होतो. त्यामुळे काळजी घ्या. H1N1 बाधितांनी इतरांशी संपर्का करताना काळजी घेणं गरजेचं आहे.डुकरांचं मटण खाण्यानं संसर्ग होत नाही. पण ते व्यवस्थित शिजवलेलं असावं. आणि स्वच्छ हातांनी तयार केलेलं असावं.

close