हे होते कमाईदार सिनेमे…

December 22, 2014 7:43 PM0 commentsViews:

2014…दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अनेक चित्रपट आले आणि गेले. काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला कमवला तर काही अगदीच फ्लॉपही ठरले.

सलमानच्या ‘किक’ ने या वर्षी सर्वात जास्त म्हणजेच सर्वात जास्त 300 कोटींचा गल्ला जमवला आहे. धूम 3, चेन्नई एक्स्प्रेस आणि 3 इडियटस् नंतर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून या चित्रपटाने नाव कमवले.
वर्षाच्या शेवटच्या काळात आलेला शाहरूखचा नवा सिनेमा ‘हॅपी न्यू इयर’ ने ही बॉक्स ऑफीसवर 300 कोटींची कमाई केली.

ह्रतिक आणि कॅटरिनाच्या जोडीनेही पडद्यावर धम्माल उडवली. ‘बँग-बँग’ चित्रपटात दुसर्‍यांदा एकत्र आलेल्या या जोडीने 181.03 कोटी कमावले.

याच वर्षी सलमानचा ‘जय हो’ सुद्धा रिलीज झाला. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर 111.00 करोड रूपये कमवले.

धडाकेबाज डायरेक्टर रोहित शर्माचा ‘सिंघम रीटर्न्स’ही खूप गाजला.अजय देवगण आणि करीना कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने 141.00 करोड रूपयांचा गल्ला कमवला.

अक्षय कुमार आणि सोनाक्षीच्या ‘हॉलीडे- सोल्जर इज नेवर ऑफ ड्युटी’ या चित्रपटाने 112.65 रूपये कमवले.

पहिल्यांदाच एकत्र आलेले सिद्धार्थ आणि श्रद्धा कपूरचा लव्ह स्टोरीवाला ‘एक व्हिलन’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 105.50 रूपयांची कमाई केली. विशेष म्हणजे रितेश देशमुख या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा व्हिलनच्या भूमिकेत दिसला होता.

‘2 स्टेटस्’ हा चित्रपटही प्रेक्षकांना खूप आवडला. या चित्रपटानेही 104.00 कोटी रूपयांचा गल्ला कमवला. यात अर्जून कपूर आणि आलिया भट यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले. प्रेक्षकांनी त्यांच्या जोडीचे खूप कौतूकही केले.

‘हम्पटी शर्मा की दुल्हनिया’ या वरुण धवन आणि आलिया भट्टच्या या चित्रपटाने 76. 81 करोड रूपये कमवले. तर नॉट लिस्ट बट लास्ट रणवीर कपूर आणि अर्जून कपूर आणि प्रियांका च्रोपा या तगड्या स्टारकास्टच्या ‘गुंडे’नेही चांगलाच धुमाकूळ घातला. ‘गुंडे’नं बॉक्स ऑफिसवर 76.55 करोड रूपये कमवले. मेरी कॉम, डेढ इश्किया, क्वीन, मर्दानी, हैदर, बॉबी जासूस, मे तेरा हिरो…या सिनेमांनी आपली दखल घेण्यास भाग पाडलं…
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close