सरबज्योत सिंगला 12 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 5, 2009 12:01 PM0 commentsViews: 3

5 ऑगस्टनाशिकमधल्या घंटागाडी प्रकरणात लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयच्या ताब्यात असणा•या सरबज्योत सिंगसह चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.त्यांना 12 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष सीबीआय कोर्टाने दिले. दरम्यान सीबीआयच्या अधिका•यांनी धमकी दिल्याचा आरोप सरबज्योत सिंगचे वकील सतिश मानेशिंदे यांनी कोर्टापुढे युक्तीवाद करताना केला.कबूली जवाब न दिल्यास बुटासिंग यांना या प्रकरणात अडकवू अशी धमकी दिल्याचाही युक्तीवाद शिंदे यांनी केला. घंटागाडी प्रकरणातला कंत्राटदार रामराव पाटील याच्याकडून 1 कोटींची लाच घेताना सीबीआयने सरबज्योतला अटक केली होती. ऍट्रॉसिटी दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यासाठी लाच घेतल्याचा आरोपही सरबज्योतसिंगवर ठेवण्यात आला. त्यानंतर त्याचे वडील आणि केंद्रीय अनुसूचित जाती-जमातीचे अध्यक्ष बुटासिंग यांनी सरबज्योतला निर्दाेष ठरवण्यासाठी खटपट सुरू केली. पण सीबीआयने सरबज्योतच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी सुरू केली आहे.

close