वर्ल्ड चॅम्पियन्सशिपच्या तयारीसाठी सायना पुन्हा कोर्टवर

August 5, 2009 12:16 PM0 commentsViews: 3

5 ऑगस्टसायना नेहवाल पुन्हा एकदा बॅडमिंटन कोर्टवर उतरली आहे. कांजण्या झाल्यामुळे जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील तिच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तिच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी तिला पुर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता.या आजाराचं वेळेतच निदान झाल्यामुळे ती वर्ल्ड चॅम्पियन्सशिपसाठी फिट असेल अशी आशा तिचे कोच पुलेला गोपिचंद यांनी व्यक्त केली. हैदराबाद येथील पुलेला गोपिचंदच्या ऍकॅडमीत तिने पुन्हा सरावास सुरूवात केली आहे.सायनाला नुकताच अर्जुन पुरस्कार जाहिर झाला. आणि या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताची मदार सायनावरच असणार आहे.

close