वेतनवाढीसाठी देशभरातील बँकांचा दोन दिवसांचा संप सुरु

August 6, 2009 6:33 AM0 commentsViews: 2

6 ऑगस्टबँकाचा देशव्यापी संप गुरुवारपासून सुरु झाला. देशभरातील सुमारे दहा लाख बँक कर्मचारी संपावर गेले आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने हा संप पुकारला आहे. 20 टक्के वेतनवाढ, पेन्शन ऑप्शन, अनुकंपा तत्वावर नोकरभरती अशा काही मागण्यांसाठी युनियनने आयबीएशी बोलणी केली होती, पण ती निष्फळ ठरल्यामुळे युनियनने संपावर जाण्याचा निर्णय घेतला. या संपात देशातल्या सहकारी बँका सहभागी झालेल्या नाहीत. मात्र 26 सरकारी बँका आणि 10 खाजगी बँका या संपामध्ये सहभागी झाल्या आहेत. ICICI आणि HDFC बँक मात्र या संपात सामील झालेले नाहीत. गुरुवार, शुक्रवार संपामुळे बंद, तर शनिवारी अर्धा दिवस कामकाज सुरु, नंतर पुन्हा रविवारी सुट्टी असल्याने ग्राहकांची गैरसोय होणार आहे.

close