राष्ट्रवादीचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा

December 23, 2014 12:09 AM0 commentsViews:

pawar_sot23 डिसेंबर : राज्यात भाजपला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रात आता भाजपविरोधात भूमिका घ्यायचं ठरवलेलं दिसतंय.राष्ट्रवादीचे नेते डी.पी. त्रिपाठी आणि तारिक अन्वर तिसर्‍या आघाडीच्या मंचावर एकत्र दिसले. एवढंच नाहीतर तिसर्‍या आघाडीसोबत चर्चा सुरू असल्याचं डी.पी. त्रिपाठींनी स्पष्ट केलं.

भाजप आणि विशेषतः नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकत्र आलेल्या जनता परिवारानं आज मुलायम सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली जंतरमंतर इथं धरणं आंदोलन केलं. यावेळी संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल आणि इंडियन नॅशनल लोकदलाचे नेते यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नेते डी.पी. त्रिपाठी आणि तारीक अन्वर हे यावेळी उपस्थित होते. तिसर्‍या आघाडीबरोबर चर्चा सुरू असल्याची माहिती डी.पी. त्रिपाठी यांनी IBN लोकमतशी बोलताना दिली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close