झारखंडमध्येही नमो..नमो, भाजप स्वबळावर सत्ता स्थापणार

December 23, 2014 10:16 PM0 commentsViews:

jharkahnd_election_modi23 डिसेंबर : ‘सबका साथ सबका विकास’, ‘अच्छे दिन आयेंगे’ आणि विकासाचं आश्वासनं देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट पुन्हा एकदा झारखंडमध्ये दिसून आली. झारखंडमध्ये भाजप मोदी लाटेवर स्वार झाली असून काँग्रेस, जेएमएमचा धुव्वा उडवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. झारखंडमध्ये भाजप आणि मित्रपक्ष यांनी मिळून बहुमताचा आकडा गाठलाय. 81 जागांपैकी 42 जागा भाजपला मिळाल्यात. पण, भाजप सत्ता स्थापन करताना बाबुलाल मरांडी यांच्या झारखंड विकास मोर्चाला सोबत घेण्याची शक्यता आहे.

झारखंडमध्ये 81 जागांसाठी आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून भाजपने आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली. भाजपने 42 जागेवर मुसंडी मारलीये. तर जेएमएमने 19 जागा जिकून दुसर्‍या स्थानावर आहे. तर काँग्रेस शेवटच्या स्थानावर फेकली गेली असून 6 जागांवर समाधान मानावे लागले. तर अपक्षांनी 6 जागा पटकावल्या आहेत. पण झारखंडमध्ये पहिल्यांदाच पूर्ण बहुमतात सरकार येणार हे जवळपास निश्चित झालंय.

झारखंडमध्ये भाजप आणि मित्रपक्ष यांनी मिळून बहुमताचा आकडा गाठलाय. 81 जागांपैकी 42 जागा भाजपला मिळाल्यात. पण, भाजप सत्ता स्थापन करताना बाबुलाल मरांडी यांच्या झारखंड विकास मोर्चाला सोबत घेण्याची शक्यता आहे. जर मरांडी भाजपसोबत गेले तर मुख्यमंत्रिपदाची शर्यत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. भाजप बिगर आदिवासीला मुख्यमंत्रिपदाची धुरा देणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. पक्षाच्या 24 तारखेला होणार्‍या पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री अर्जून मुंडांना मात्र पराभवाचा सामना करावा लागलाय.

झारखंडमध्ये भाजप नेहमी सर्वात मोठा पक्ष म्हणून आतापर्यंत समोर आला आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुका आणि स्वतंत्र्य राज्यानंतर विधानसभा निवडणुकीतही भाजपने मुसंडी मारली होती. पण युती करूनच सरकार स्थापन करता आलं. 2005 च्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 30 जागा पटकावल्या होत्या. 2009 मध्ये भाजप आणि जेएमएमने 18-18 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला होता आणि युतीचे सरकार स्थापनही केलं होतं. पण जेएमएमच्या दबावामुळे युती तुटली आणि सरकार बरखास्त झालं. पुढे जेएमएमने काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन केलं. पण आता केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर झारखंडमध्ये बहुमताकडे झेप घेतलीये.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close