गेटवे-झवेरी बॉम्बस्फोटातील दोषींना फाशीची शिक्षा

August 6, 2009 8:39 AM0 commentsViews: 48

6 ऑगस्टमुंबईतील झवेरीबाजार आणि गेटवे ऑफ इंडिया जवळ 25 ऑगस्ट 2003ला झालेल्या बॉम्बस्फोटातील तीनही दोषींना गुरूवारी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकीलांनी केली होती. या आधीच्या सुनावणीत कोर्टानं महम्मद हनीफ सय्यद, त्याची पत्नी फहमिदा आणि अशरद शमिक अन्सारी यांना दोषी ठरवलं होतं. त्यांच्या शिक्षेची सुनावणी मंगळवारी 4 ऑगस्टला होणार होती. पण 6 ऑगस्टपर्यंत म्हणजेच गुरूवारपर्यंत ती पुढे ढकलण्यात आली होती. या बॉम्बस्फोटाचा कट दुबई आणि पाकिस्तानमधील अज्ञात शहरात रचण्यात आला होता. घाटकोपर बसमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बची क्षमता कमी होती. त्यामुळे ते झवेरी बाजार आणि गेटवे इथे मोठ्या क्षमतेचे बॉम्बस्फोट घडवून आणले. मुंबादेवी इथेही बॉम्बस्फोट घडवण्याचा त्यांची योजना होती. त्यामुळे या आरोपींना फाशीचीच शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विशेष पोटा कोर्टाकडे केली होती. 2003 मध्ये झालेल्या या स्फोटांमध्ये 54 जणांचा बळी गेला होता. हा खटला गेल्या सहा वर्षापासून सुरू होता. तर या प्रकरणातून महम्मद हनीफची मुलगी फरहीन, रिझवान लड्डूवाला, आणि शेख बॅटरीवाला यांना मुक्त करण्यात आलं होतं.

close