जिजाऊ यांच्या राजवाड्यातील ऐतिहासिक तोफ चोरीला

December 23, 2014 5:17 PM0 commentsViews:

23 डिसेंबर : राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यातील 85 किलोची ऐतिहासिक तोफ चोरीला गेल्याची घटना उघडकीस आलीये. मातृतिर्थ सिंदखेडराजा इथून जवळच असलेल्या आडगाव राजा इथल्या जिजाऊ यांचे वडिल राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यात काही वर्षांपूर्वी खोद्कामात पंचधातूच्या सहा तोफा सापडल्या होत्या. त्या तोफ सिंदखेडराजा इथल्या जिजाऊंच्या महालात पुरातत्व विभागाने पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवल्या होत्या. पण सोमवारी रात्री त्यातील एक तोफ चोरीला गेली असल्याने खळबळ उडाली आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close