2014 कसं राहिलं मोबाईल विश्वासाठी ?

December 23, 2014 10:34 PM1 commentViews:

मनुष्याला जसं अन्न, पाणी, निवारा लागतं त्याच रांगेत आता मोबाईल फोनही जमा झाले आहे. मोबाईल फोन आता गरजेचा नाहीतर
शोभेचा म्हणा किंवा प्रतिष्ठेचाही होऊन बसला आहे. हजारो फोन…लाखो फिचर…नजर टाकालं आणि विचार करालं एवढे स्वस्त आणि मस्त फोन…पण खिसाही जरा जपूनच…! त्यामुळे सरतं वर्ष हे अशाच काही स्वस्त आणि मस्त फोनमुळे चर्चेत राहिलं…गॅजेटचं हे विश्व जितकं आधुनिक तितकं रंजक…एक फोन गेला तर दुसरा फोन आलाच…असंच काहीसं या सरत्या वर्षात घडलं…त्याच बद्दलचा हा धावता आढावा…

या वर्षाच्या सुरुवातीला गॅजेटच्या या जगात सर्वात मोठी घडामोड घडली ती नोकियासोबत….भारतात आपले एक वेगळे स्थान निर्माण करणार्‍या नोकिया मोबाईल कंपनीला मायक्रोसॉफ्ट कंपनीने विकत घेतलं. नोकिया सारखी तगडी कंपनी मायक्रोसॉफ्टमध्ये विलीन झाली. आणि नोकियाने तयार केलेल्या लुमिया या स्मार्टफोनच्या फिचरमध्ये थोडेफार बदल करुन मायक्रोसॅाफ्ट लुमिया 535 हा नवा स्मार्टफोन बाजारात आणला. 28 नोव्हेंबरला सर्वत्र उपलब्ध झालेल्या या फोनचा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हा फोन गडद हिरव्या, सफेद, गडद नारंगी, तपकिरी आणि काळ्या रंगात उपलब्ध झाला आहे.

त्यानंतर शोककळा पसरली ती ‘ब्लॅकबेरी’वर….ब्लॅकबेरीनेही आपला नवा फोन बाजारात आणला आहे. काही काळापासून ब्लॅकबेरीने आपले नवे फोन बाजारात आणले नव्हते, त्यामुळे ग्राहकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. ब्लॅकबेरी नवे काय देणार याकडे सार्‍यांचेच लक्ष लागले होते. आता ब्लॅकबेरीने आपला नवा क्लासिक फोन उपलब्ध करून दिला खरा पण, हा स्मार्टफोन पाहुन काहींच्या अपेक्षाभंग झाल्यात. कारण याचे डिजाईन हे तेच जुन्या पद्धतीचे म्हणजेच की-पॅड फॉरमॅटचे आहेत. शिवाय 449 डॉलरमध्ये हा स्मार्टफोन केवळ ऍमेझॉन डॅाट कॅाम वर उपलब्ध आहे. त्यामुळे अगोदरच अँड्राईडमय झालेल्या मोबाईल ग्राहकांनी याकडे पाठच फिरवली.

भारतीय बाजारात पहिला मोबाईल फोन आणणारी कंपनी म्हणजे मोटोरोला. तब्बल दोन वर्षांनंतर बाजारात पुन्हा एकदा मोटो-G हा स्मार्टफोन घेऊन या कंपनीने कम-बॅक केले आहे. इतक्या उशिरा बाजारात उतरूनही उत्तम स्मार्टफोनस्‌च्या तुलनेत महत्वाचे स्थान मिळवणार्‍या मोटो-G इतर फोनच्या तुलनेत चांगले फिचर देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यात ते यशस्वी ही झाले आहेत.

एक नावाजलेला आणि विश्वासू ब्रॅन्ड म्हणून ‘सोनी’कडे पाहिले जातं. सोनीने आपला एक्सपेरीया झे-3 हा नवा स्मार्टफोन बाजारात आणला. यात दोन महत्वाचे आणि वेगळेपण सिद्ध करणारे फिचर्स आहेत. पहिला म्हणजे या फोनचा 20.7 मेगापिक्सल असा तगडा कॅमेरा. आणि दुसरा म्हणजे याचे वॅाटरप्रूफ असलेले डिझाईन…हा याचा सर्वात मोठा फायदा आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन कितीही पाण्यात पडला तरी काळजी करण्याचे कारण नाही.

त्यापाठोपाठ सॅमसंग या कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. सॅमसंग हा एक मोठा ब्रँड बनला आहे. नुकताच सॅमसंगने आपला गॅलेक्सी ग्रॅन्ड फॅब्लेट बाजारपेठेत आणला आहे. याची विशेषत: म्हणजे हा फोन पांढर्‍या, काळ्या आणि गुलाबी रंगात आहे. त्याचबरोबर नोटची सिरीजही चांगलीच गाजली. एवढेच नाहीतर ऍपलला टक्कर देत गिअर वॉचही लाँच केले.

तर एलजी या कंपनीनेही स्मार्टफोनच्या जगतात ग्राहकांना काहीतरी नवीन द्यावे या हेतूने पहिला कर्व फोन बाजारात आणला आहे. भारतीय बाजारपेठेत सर्वात महागातला फोन अशी याची ओळख झाली पण जरा वरच्या फळीतल्या ग्राहकांनाच भावला.

चायनिज मॅनिफॅक्चर असलेल्या ‘ओप्पो’ या कंपनीनंही भारताकडे आपला मोर्चा वळवला आहे. पहिलाच ओप्पो एन 1 हा एक वेगळाच फोन बाजारात आणला. वेगळा यासाठी की यात रोटेट कॅमेरा आहे. 13 मेगापिक्सलचा 360 डिग्री रोटोशनचा हा कॅमेरा आहे.

‘मायक्रोमॅक्स’ या कंपनीने काही दिवसांपूर्वाच भारतीय बाजारपेठेत आगमन केले. मात्र काही काळातच ही कंपनी लोकप्रिय झाली. या कंपनीच्या फोनस्‌ने सर्वत्र धुमाकूळ घातला. याच्या आगमनाने गॅजेट मार्केटमध्ये प्रचंड हालचाली घडल्यात. या कंपनीने अगदीच कमी किंमतीत चांगले फिचर्स दिल्याने सर्वच मोठमोठ्या मोबाईल कंपनीचे भाव कमी झाले. त्यामुळे एका भारतीय कंपनी बड्या कंपन्यांना चांगलाच घाम फोडला..अजून मायक्रोमॅक्सचे वर्चस्व बाजारातून टीकून आहे आणि सर्वसामान्यांच्या खिश्यावर तो राज्य करत आहे…
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • SJ

    Xiaomi also made dashing entry in the market. You will see more from them in coming days. Great phones they have, Mi-3, Redmi 1s, Redmi Note etc.

close