दहावी एटीकेटीच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टाची स्थगिती

August 6, 2009 10:48 AM0 commentsViews: 5

6 ऑगस्ट दहावी विद्यार्थ्यांसाठीच्या एटीकेटी निर्णयाला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती 22 ऑगस्ट पर्यंत देण्यात आली आहे. सरकारकडे एवढ्या विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था आहे का याचा विचार सरकारने केला नाही तसंच हा निर्णय घाईत घेण्यात आला असं कोर्टाने स्थगिती देताना म्हटलं आहे. शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटी देण्याचा निर्णय घेतला होता. बारावीच्या विद्यार्थ्यांनाही एटीकेटी देण्याचा प्रस्ताव होता.

close