संजय दत्त पुन्हा जेलबाहेर, 14 दिवसांची सुट्टी मंजूर

December 23, 2014 11:37 PM1 commentViews:

sanjay dutt in jail23 डिसेंबर : 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणार अभिनेता संजय दत्तला आणखी 14 दिवसांच्या सुट्टीवर जेलबाहेर येणार आहे. संजय दत्तने फर्लोसाठी केलेला अर्ज मंजूर करण्यात आलाय. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर संजूबाबाला सुट्टी मिळणार आहे.

अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीये. त्यापैकी अठरा महिन्याची शिक्षा संजयने अगोदरच भोगली आहे. उर्वरीत शिक्षा भोगण्यासाठी संजयची रवानगी पुण्यातील येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आलीये पण, या शिक्षेत, संजय दत्तने आतापर्यंत वारंवार सुट्टी घेतली आहे. तुरुंगात जाताच काही दिवसांतच 14 दिवसांच्या रजेवर संजय बाहेर आला होता. त्यांनतर हा सिलसिला कायम सुरूच झाला. आता पुन्हा एकदा संजयने 14 दिवसांची सुट्टी मागितली आहे. संजयची सुट्टी मंजूर झाली आहे. काही तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर संजूबाबा पुन्हा जेलबाहेर येणार आहे.

सुट्टी बहाद्दर संजूबाबा

– 21 मे 2013 : संजय दत्त येरवड्यात
– 1 ऑक्टोबर 2013 : 14 दिवसांची रजा (फर्लो)
– 14 ऑक्टोबर 2013 : फर्लोमध्ये 14 दिवसांची वाढ
– 21 डिसेंबर 2013 : 1 महिन्याची सुट्टी
– 20 जानेवारी 2014 : महिनाभराची वाढीव सुट्टी
– 18 फेब्रुवारी 2014 : पॅरोलमध्ये 30 दिवसांची वाढ

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Shirish Batule

    आरोपीना कशी काई सुट्टी मिळते

close