आसाममध्ये बोडो अतिरेक्यांच्या हल्ल्यात 50 ठार

December 24, 2014 8:40 AM0 commentsViews:

maoists attack

24  डिसेंबर :आसाममध्ये बोडो अतिरेक्यांनी काल (मंगळवारी) 5 वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या हल्ल्यात 50 गैरबोडो नागरिक ठार झाले असून, मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. यापैकी सोनतीपुरात 33 तर कोक्राझारमध्ये चौघांची हत्या करण्यात आली आहे.

त्यानंतर काल (मंगळवारी) रात्री उशिरा या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इथे लष्कराच्या जवानांना तैनात करण्यात आले असून, सध्या संपूर्ण आसाममध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माओवाद्यांनी उत्तर आसाम आणि अरुणाचल प्रदेशातल्या सीमाभागांना लक्ष्य केल्याचे समजते.
पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच बोडो अतिरेक्यांविरोधात हाती घेतलेल्या मोहिमेच्या निषेधार्थ हा हल्ला करण्यात आल्याचे समजते. या मोहिमेत स्थानिक आदिवासी लोकांनी पोलिसांना मदत केल्याच्या संशयावरून हे हत्याकांड केल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून या हल्ल्याचा निषेध केला आहे. आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याशी आपण या संदर्भात बोललो असून, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह लवकरच या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राजनाथ सिंह यांनीही माओवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध करून कें द्राकडून आसाममधील परिस्थितीवर सातत्याने नजर ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

हा हल्ला का झाला असावा?

– NDFB या संघटनेच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांना रविवारी सुरक्षा बळांनी कंठस्नान घातलं. याचा बदला म्हणून हा हल्ला केला असावा
– गेल्या एक महिन्यात अनेक बोडो अतिरेक्यांना अटक
– आगामी बोडोलँड स्वायत्त हिल काऊंसिल निवडणुकीच्या आधी दहशत पसरवणं
– मृतांमध्ये अनेक आदिवासी नागरिकांचा समावेश. आदिवासी सुरक्षा बळांना मदत करतात असा या अतिरेक्यांना संशय आहे
– सरकार आणि इतर बोडो संघटनांमधल्या चर्चांना फळ येतंय. या चर्चांमध्ये अडथळा आणणे

कुणी केला हा हल्ला ?

– नॅश्नलिस्ट डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड ह्या अतिरोकी संघटनेनं हा हल्ला केला
– भारत सरकारनं या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलंय
– बोडोलँड नावाच्या स्वतंत्र देशाची मागणी
– 3 ऑक्टोबर 1986 रोजी बोडो सेक्युरिटी फोर्सची स्थापना
– रंजन दायमारी यांनी केली या संघटनेची स्थापना
– काही वर्षांनी बोडो सेक्युरिटी फोर्सचं नाव बदलून NDFB असं ठेवण्यात आलं

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close