भारताला वर्ल्डकप जिंकून द्यायचं सचिनचं स्वप्न

August 6, 2009 12:54 PM0 commentsViews:

6 ऑगस्टसचिननं नवं मिशन हाती घेतलं आहे. त्याला टेस्टमध्ये पंधरा हजार रन्सचा टप्पा पार करायचा आहे. विसडेन क्रिकेटरला दिलेल्या मुलाखतीत सचिनने आपल्या क्रिकेटमधील टार्गेट बाबतही माहीती दिली आहे. भारताला 2011चा वर्ल्ड कप जिंकून देण्याचंही सचिनचं स्वप्न आहे. सचिन तेंडुलकर गेले जवळ जवळ 4 महिने क्रिकेटच्या मैदानापासून दुर आहे. म्हणूनच की काय पुन्हा बॅट उचलायला त्याचे हात शिवशीवत आहेत. ऑस्ट्रेलियाचे माजी कोच जॉन बुकानन यांच्या आत्मचरित्रात सचिनवर टीका केली होती. त्यावरही सचिनने आपलं स्पष्ट मत मांडलय. आणि पुन्हा एकदा क्रिकेटमधून आपण इतक्यात रिटायर्ड होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

close