पोलीस असल्यांचं सांगून प्रेमीयुगुलांना लुटणारी टोळी जेरबंद

December 24, 2014 8:08 PM0 commentsViews:

jail24 डिसेंबर : पोलीस असल्याचं सांगून प्रेमीयुगुलांना लुटून तरुणीवर बलात्कार करणार्‍या टोळीला पकडण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. या टोळीने असे 40 पेक्षा जास्त गुन्ह्यांची कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे. या आरोपींविरुद्ध मोक्का अंर्तगत कारवाई केली जाणार आहे.

हे गुंड नागपुरात प्रेमी युगुलांना पोलीस असल्याची बतावणी करून मुलांना लुटून तरुणीवर बलात्कार करत होते. अनेक अशा कृत्यांची मोबाईवरही त्यांनी रेकॉर्डिंग केले आहे जे पोलिसांनी जप्त केले आहे. आरोपींकडून पोलिसांचे बनावट ओळखपत्रही मिळाले आहेत.
नागपूरच्या खरबी येथील आऊटर रिंग रोडवर 1 डिसेंबरला आपल्या मित्रांसोबत फिरायला गेलेल्या शिक्षिकेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणात कुख्यात आरोपी मोहम्मद अफरोजसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सुदर्शन महेशकर, पुंडलिक भोयर, अनिल इंगले आणि अश्विन दोनोडे अशी आरोपींची नावे आहेत. जवळपास 22 दिवस तपास करून या आरोपींना मुंबईहुन पकडण्यात आलंय. या आरोंपीविरुद्ध मोक्का अंर्तगत कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणातील आरोपी अफरोजविरुद्ध खुनासह 15 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत तर सुदर्शनविरुद्ध सात आणि पुंडलिक भोयरवर 35 गुन्हे दाखल आहेत. खुनाची शिक्षा भोगत असतांना अफरोजची या गुन्हेगारांसोबत कारागृहात भेट झाली तिथेच त्यांनी ही टोळी तयार केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close