प्रेम, लग्न आणि हत्या ; गडचिरोलीत 5 वर्षांत 15 तरुणींचा बळी

December 24, 2014 8:26 PM0 commentsViews:

nanded_gf_kill24 डिसेंबर : प्रेम, लग्न आणि हत्या…एखाद्या सिनेमात शोभावं अशी थराराक घटना नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात घडल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत 15 तरूणींची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे खळबळ उडालीये. या मुलींचं लैंगिक शोषण करून हत्या करणारी टोळी गजाआड करण्यात पोलिसांना यश आलंय. आदिवासी भागांमध्ये अशा मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून या मुलींचं लैंगिक शोषण केलं जायचं आणि त्यांना ठार मारलं जायचं. मृत तरूणींची संख्या 20 वर जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना यामध्ये अटक करण्यात आलीये.

गडचिरोली जिल्ह्यात दक्षिण भागातल्या आदिवासी युवतींना प्रेमात अडकवून लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्यानंतर त्या युवतीना ठार मारणारी टोळी उघड झालीये. या टोळीने गेल्या पाच वर्षात पंधरापेक्षा जास्त तरुणीना ठार केल्याच तपासात उघड झाल असून हा आकडा वीसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. धक्कादायक म्हणजे भामरागड तालुक्यातल्या हेमलकसा येथील एका बेपत्ता असलेल्या युवती संदर्भात तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तिचा प्रियकर असलेल्या वनरक्षक मनोज सडमेकला अटक केली होती. गेली पाच वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या त्या तरुणीला गडचिरोलीतून बोलावून कासमपल्लीच्या जंगलात गळा दाबून मनोजने तिची हत्या केली होती. त्यानंतर जंगलातल्या एका लाकडी ढिगारात तिचा मृतदेह जाळला. पोलिसांनी मनोजला घटनास्थळी नेऊन तपास केला. दरम्यान, तपासामध्ये मनोजसोबतच पाच जणांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली. 2009 पासून तीन तालुक्यातल्या पंधरापेक्षा जास्त तरुणीना प्रेमात फसवून त्यांचे लैंगिक शोषण केल्यानंतर ठार करुन मृतदेहाची विल्हेवाट या टोळीने लावल्याचे तपासात उघड झालंय. आदिवासी भागात घडलेल्या या प्रकरणामुळे पोलीस खाते हादरुन गेलंय. अहेरी उपविभागात गेल्या पाच वर्षांत बेपत्ता असलेल्या तरुणींसंदर्भात आलेल्या तक्रारींची या निमित्ताने पोलिसांनी चौकशी सुरू केलीये.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close