एअर इंडियाची लो कॉस्ट सेवा

August 7, 2009 11:04 AM0 commentsViews: 1

7 ऑगस्ट आर्थिक अडचणींमध्ये सापडलेल्या एअर इंडियानं आता देशांतर्गत लो कॉस्ट विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 'एअर इंडिया एक्सप्रेस' नावानं सप्टेंबरपासून 24 शहरांसाठी ही सेवा सुरु केली जाईल. कॉस्ट कटींगसाठी उच्चपदस्थ अधिकार्‍यांच्या पगार आणि भत्त्यांमध्ये घट करण्याचाही एअर इंडिया मॅनेजमेंटचा विचार आहे. आणि यासाठी सरकारनेही सहमती दर्शवली आहे. दरम्यान, कंपनीची आर्थिक फेररचना त्वरीत व्हावी या मागणीसाठी महिनाभर आंदोलन करण्याचा इशारा एअर इंडिया युनियन्सनी दिलाय. तसंच मागच्या आठवड्यात एअर इंडियानं सरकारकडे बेलआऊट पॅकेजची मागणी केल्याचीही बातमी आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आता पहिल्यांदाच एअर इंडियाचे सीएमडी अरविंद जाधव यांनी पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय जाहीर केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एअर इंडियाने सरकारकडे 15 हजार कोटींच्या बेलआऊटची मागणी केली आहे. आर्थिक मंदीच्या काळात एअर इंडियाला अंदाजे सात हजार दोनशे कोटींचं नुकसान झालंय.

close