एम. के. मढवीची बँक अकाऊंट्स सील

August 7, 2009 11:11 AM0 commentsViews: 5

7 ऑगस्टएम. के. मढवी आणि त्याच्या नातेवाईकांची मिळून 12 अकाऊंट्स सील करण्यात आली आहेत. नवी मुंबई पोलिसांनी गुरुवारी ही कारवाई केली. मढवी स्वत:ला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता. यामध्ये पोलिसांवर राजकीय दबावही होता. हायकोर्टानं जेव्हा मढवीचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला. त्यानंतर खर्‍या अर्थाने पोलीस कामाला लागले. असं असूनही मढवी पोलिसांच्या हाती लागत नाही. लवकरच मढवीची प्रॉपर्टीही जप्त केली जाण्याची शक्यता आहे. आणि तसं झाल्यास त्याला शरण येण्यावाचून गत्यंतर राहणार नाही. मढवीच्या बँक अकाऊंट्स कारवाई केली जात नसल्याची बातमी IBN लोकमतने दाखवली होती.

close