पुण्यात H1N1चे दोन पेशंट गंभीर

August 7, 2009 11:17 AM0 commentsViews: 1

7 ऑगस्टपुण्यात H1N1चा प्रसार वाढतच आहे. शुक्रवारी दोन पेशंटस गंभीर आढळले आहेत. या दोघांनाही ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असली, तरी स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. यात एका 36 वर्षाच्या डॉक्टरची प्रकृती गंभीर आहे. त्यांना ससून रुग्णालयात भरती करण्यात आलंय. या दोन्ही रुग्णांवर ससूनमध्येच उपचार सुरु आहेत. सध्या त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलंय. तर दिल्लीतल्या संस्कृती शाळेमधल्या एका विद्यार्थ्याची H1N1ची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.

close