आसाम धुमसतंय!, हिंसाचारात मृतांची संख्या 68 वर

December 24, 2014 10:50 PM0 commentsViews:

Assam violence24 डिसेंबर : बोडो अतिरेक्यांच्या हल्ल्यामुळे आसामला हादरा बसलाय. आसाममधील हिंसाचारात बळी पडलेल्यांची संख्या आता 68 वर गेलीय. मंगळवारी बोडो अतिरेक्यांनी 62 जणांची हत्या केली होती. तर पोलिसांनी केलेला गोळीबार आणि आदिवासी गावकर्‍यांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात आज 6 जणांचा बळी गेलाय.

आसाममध्ये पेटलेल्या हिंसाचारामुळे कोकराझार आणि सोनीतपूर भागामधली संचारबंदी आजही कायम आहे. या हिंसाचारामध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आसाम सरकारने 5 लाखांची मदत जाहीर केलीय. तर जखमींना 50,000ची मदत करण्यात येणार आहे. तर केंद्र सरकारनेही मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केलीय. परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह गुवाहाटीच्या दौर्‍यावर आहेत. आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई आणि युनिफाईड कमांडसोबत गृहमंत्र्यांची बैठक होणार आहे. राजनाथ सिंह उद्या कोकराझारला भेट देतील. नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँच्या अतिरेक्यांनी कालचा हल्ला केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आसाममध्ये आता सुरक्षा दलांच्या 50 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close