देशभरात ख्रिसमसची धूम…!

December 25, 2014 8:58 AM0 commentsViews:

25 डिसेंबर : देशभरात मध्यरात्रीपासूनच ख्रिसमसचं उत्साहात सेलिब्रेशन तसंच राज्यातही ख्रिसमसचा साजरा होत आहे.

देशातल्या प्रत्येक शहरात मध्यरात्री ख्रिसमस मास झाले. मास अर्थात येशूच्या जन्मानिमित्त करण्यात येणार्‍या प्रार्थनेला ख्रिस्ती बांधवांनी मोठी गर्दी केली. ख्रिश्चन बांधवांनी गळाभेट घेवून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. शिवाय नाताळचं खरं आकर्षण असतं ते ख्रिसमस बाबा म्हणजे सांताक्लॉज. जो बच्चेकंपनीला छान छान भेटवस्तू देऊन जातो. त्यामुळे आजच्या दिवसाची बच्चेकंपनी सांताची आतुरतेनं वाट पाहात असतात.

येशू ख्रिस्ताचा जन्म गोठ्यात झाला होता. त्यामुळे ख्रिसमसच्या दिवशी खास गोठा बांधला जातो. या गोठ्यात येशूंच्या जन्मसोहळ्याचा देखावा सजवला जातो तर दुसरीकडे ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवले जातात. नाताळच्या सेलिब्रेशनला मुंबापुरीत जोरदार सुरुवात झाली आहे. मध्यरात्री मुंबईतल्या विविध चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थना केली. मुंबईच्या माहीम चर्चमध्ये ख्रिसमसनिमित्त खास ख्रिसमस ट्री, चांदण्या आणि बेल्सची सजावट पाहायला मिळाली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देशवासीयांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्यात.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close