वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त मोदींची सदिच्छा भेट!

December 25, 2014 12:15 PM0 commentsViews:

Narendra_Modi_360_Atal_Bihari_Vajpayee_360

25 डिसेंबर :पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीच्या दार्‍यावर जाणार आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि मदन मोहन मालवीय यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सरकारच्या वतीने ‘गुड गव्हरर्नंस डे’ म्हणजेच ‘सुशासन दिन’ साजरा करत आहे. त्यासाठी पंतप्रधान वाराणसीला जाणार आहेत. वाराणसीत मोदींनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या घरी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या आणि भारतरत्नच्या शुभेच्छा दिल्या. तसेच वाजपेयी यांचे आशिर्वादही घेतले.

वाराणसी दौ-यादरम्यान पंतप्रधान मोदी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. त्यात अस्सी घाटावर सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाचा आढावा घेण्यासाठी मोदी याठिकाणी भेट देणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. गेल्या महिन्यात मोदींनी याठिकाणी स्वच्छता अभियानाला सुरुवात केली होती.

मोदी यावेळी बनारस हिंदु विद्यापीठाला भेटही देणार आहेत. त्याठिकाणी मोदी विद्यापीठाच्या प्राध्यापक प्रशिक्षण केंद्राची पायभरणी करणार आहेत. मदन मोहन मालवीय यांच्या नावाने हे केंद सुरू करण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठ परिसरात मोदी वाराणसी महोत्सवाची सुरुवात करण्याचीही शक्यता आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close