प्रभात चित्रपटगृहाचा आज शेवटचा दिवस !

December 25, 2014 1:42 PM0 commentsViews:

Prabhat

 25 डिसेंबर : मराठी चित्रपटांचे माहेर घर समजले जाणारे पुण्यातील प्रभात चित्रपटगृहाचा आजचा (25 डिसेंबर 2014 ) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्यापसून हे चित्रपटगृह प्रेक्षकांच्या सेवेतून निवृत्त होणार आहे. मराठी चित्रपटांसाठी हक्काच घर असलेल्या प्रभात थिएटरचा आज शेवटचे खेळ आहे.

प्रभात फिल्म कंपनीने हे चित्रपटगृह 21 सप्टेंबर 1934 रोजी भाड्यावर घेतले होते. आज या कराराचा शेवटचा दिवस असल्याने प्रभात चित्रपटगृह मूळ मालक किबे यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. प्रभात चित्रपटगृह सुरू झाल्यापासून येथे 1300 हून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मराठी चित्रपटांशी असलेल अतूट नात, आज तूटणार आहे. मावळतीचा ‘प्रभात’ पाहणं अनेकांसाठी अवघड जाणार आहे.

प्रभात बंद होणार हे समजल्यावर अनेक चाहत्यांनी प्रभातच्या आठवणींना उजाळा दिला. तर, अनेकांनी प्रभात चित्रपट गृहात (ता.24 ) बुधवारी जावून चित्रपट बघता बघता चित्रपट गृहाच्या आठवणी आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवण्याचा प्रयत्न केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close