जिजाऊच्या राजवाड्यातून चोरी गेलेली तोफ सापडली

December 25, 2014 4:54 PM0 commentsViews:

jijamata_tofa25 डिसेंबर : राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यातील चोरी गेलेली तोफ अखेर सापडली आहे. एका शेतात ही तोफ पुरण्यात आली होती. या प्रकरणी बाळू म्हस्के या शेतकर्‍याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ही तोफ ताब्यात घेतली आहे.

सिंदखेडराजामधील राजमाता जिजाऊंच्या राजवाड्यामध्ये 85 किलो वजनाच्या दोन पंचधातूच्या तोफा पर्यटकांना पाहण्सायाठी ठेवण्यात आल्या होत्या. 20 वर्षांपूर्वी अडगावराजा येथील गढीचे खोदकाम करताना पंचधातूच्या 8 तोफा सापडल्या होत्या. या तोफा सिंदखेडराजा येथील राजवाड्यात जमा करण्यात आल्यात. मात्र सोमवारी चोरट्यांनी यातील एक तोफ पळवली. सोळाव्या शतकातील पंचधातूंची 85 किलो वजनाची ऐतिहासिक तोफ चोरीला गेल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेमुळे सामाजिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाची भूमिका घेतली होती. पोलिसांनी सर्वत्र याचा शोधाशोध सुरू केला. अखेर तीन दिवसांच्या आता पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. राजवाड्यापासून 1 किलोमीटर अंतरावर बाळू म्हस्के नामक व्यक्तीच्या शेतात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता शेतात ही तोफ पुरण्यात आली होती. पोलिसांनी ही तोफ ताब्यात घेतली असून बाळू म्हस्के याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close