यावर्षी सर्वात गाजलेले ‘फिल्मी’ क्षण…

December 25, 2014 5:26 PM0 commentsViews:

मनोरंजनाच्या क्षेत्रात शाहरूख आणि सलमानचे सूर जुळण्यापासून ते गौहर खानच्या एका अज्ञात इसमाने कानाखाली मारण्यापर्यंत अनेक क्षण चांगलेच गाजले. यातील बरेच क्षण मग मोस्ट ‘ड्रॉमाटिक मुव्हमेंटस् ऑफ द इयर’ ठरले. आम्ही तुमच्यासाठी काही असं क्षण घेऊन आलो आहोत, ज्या घटनांनी न्यूज चॅनेलचा मनोरंजनाचा कोटा भरून काढला. बर्‍याच वेळा यांतील अनेक घटनांनी मथळा सजला. पाहुयात यातील काही खास क्षण…

यावर्षाच्या शेवटला सलमानची मानलेली बहीण अर्पिताचे लग्न मोठे थाटामाटात पार पडले. हे लग्न अनेक करणांमुळे गाजले आणि
त्यातल्या त्यात मोठीच चर्चा झाली ती शाहरूखने जेव्हा अर्पिताच्या लग्नात हजेरी लावली. यावर्षी सलमान आणि शाहरूखचे पॅच-अप झाले. याआधिही इफ्तार पार्टीमध्ये हे दोघेजण एकत्र आले होते. त्यावेळी दोघांनी गळाभेट घेतली होती. आता मात्र यावेळी त्यांची चांगलीच गट्टी जमलीये असं दिसतं.

लग्न झाल्यापासून विश्वसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चन हीने बॉलिवूड चित्रपटांतून जणू काढता पाय घेतला होता. पुरस्कार सोहळ्यांनाही ती मम्मी स्टाईलमध्येच येण पसंत करत होती. यावर्षात मात्र ऐश्वर्याने पुन्हा एकदा कम-बॅक केलं आहे. एका फिल्म फेस्टिव्हलच्या दरम्यान ऐश्वर्या गोल्डन रंगाचा गाऊन घालून आली आणि सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

हल्ली सेल्फीची चांगलीच क्रेझ पहायला मिळतेय. अगदी हॉलिवूड स्टारस्‌ही यापासून अलिप्त नाही. ऑस्कर होस्ट ऐलिन डेजेनरेस हीने सर्व नामांकित हॉलिवूड सिनेस्टारस् सोबत एक मस्त सेल्फी काढलाय. ‘सेल्फी ऑफ द इयर’ यांमध्येही याचा समावेश आहे.

बॉलिवूड बादशाह शाहरूख खानचा सर्वात लहान मुलगा अब्राम हा लोकप्रिय सेलिब्रिटी बाळ ठरला. गेल्या वर्षी शाहरूख-गौरीने सरोगेट माता-पिता होणे स्विकारले होते. यावरून बरीच चर्चाही झाली आणि कॉन्ट्रोवर्सीही. त्यामुळे त्यांनी अब्रामचे फोटो सोशल मीडियावर येणार नाही याची काळजी घेतली. मात्र याचवर्षी ईदला शाहरूखने स्वत: अबरामचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून सडेतोड उत्तर दिले.

यावर्षाच्या स्क्रिन ऍवॉर्ड च्या सोहळ्यादरम्यान अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे पहिल्यांदाच सर्वांसमोर इतक्या जवळ आलेले बघायला मिळाले. सिनियर कपल इतक्या फिल्मी स्टाईलने पहिल्यांदाच अशा प्रकारचे प्रेम व्यक्त करताना आढळले. त्यामुळे सर्वांनाच
आश्चर्याचा झटका बसला.

इंडियाज रॉ स्टार या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान शोची होस्ट गौहर खान ही मुस्लीम असूनही अश्लील गाण्यांवर डान्स करते, तोकडे कपडे घालते यामुळे एका इसमाने स्टेजवर येऊन गौहरच्या कानाखाली मारली होती. नंतर त्याला अटकही करण्यात आली.

ंरोहतक येथे बसमध्ये छेड काढणार्‍या तिघा तरूणांचा दोन बहिणींनी विरोध केला. केवळ विरोधच केला नाही तर उलट त्यांना बेल्टने मारहाणही केली. पण या तरुणींनी मारहाण केल्यावरून चांगलाच वाद रंगला होता. या तरुणींची छेड काढण्यात आली नव्हती या मुलींनीच मारहाणीला सुरुवात केली होती असा आरोपही झाला.

तर दिपिका पदुकोण या अभिनेत्रीच्या कपड्यांवरून मीडियाने तीला डिवचले होते. यावेळी दिपिकाचा राग अनावर झाला. याविरोधात पत्रकार परिषद घेऊन मीडिया विरोधात नेमक्या आणि तीव्र शब्दात तीने राग व्यक्त ही केला. मात्र दुसर्‍याच दिवशी दिपिका एका म्यूझिक लॉन्चच्या कार्यक्रमाला चक्क साडी घालून उपस्थित राहिली.

मिका सिंग आणि राखी सावंत पुन्हा एकदा एकाच मंचावर फिल्मी स्टाईलने एकत्र आले. गाजलेल्या चुंबन प्रकरणानंतर त्यांनी एकमेकांना भेटणे तर सोडाच एकमेकांचे चेहरे बघणेही सोडले होते. मुंबईत ‘मुंबई कॅन डान्स साला’ या आगामी चित्रपटाच्या कार्यक्रमादरम्यान हे दोघ एकत्र आले आणि आलिंगन देऊन दुरावाही मिटवला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close