मंगळवारी एमफुक्टोचे राज्यव्यापी जेलभरो आंदोलन

August 11, 2009 10:23 AM0 commentsViews:

11 ऑगस्टगेले अनेक दिवस सुरु असलेला प्राध्यापकांचा संप चिघळण्याची चिन्हं दिसत आहेत. मंगळवारी एमफुक्टोने राज्यव्यापी जेलभरो आंदोलनाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातल्या डिग्री कॉलेजचे तीस हजार प्राध्यापक सध्या संपावर आहेत. सहावा वेतन आयोग लागू करावा आणि 1991 ते 1999 या कालावधीत नेमलेल्या प्राध्यापकांना नेट सेटमधून सुट द्यावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी हा बेमुदत संप पुकारला होता. प्राध्यापकांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत त्यांचा संप सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या या संपामुळे विद्यार्थ्यांना मात्र अघोषित सुट्‌ट्या मिळाल्या आहेत.

close