धुळ्यात आश्रमशाळेतील मुलीला पळवून नेऊन बलात्कार

December 25, 2014 6:48 PM0 commentsViews:

rape_63456525 डिसेंबर : धुळे जिल्ह्यातील साक्रीत एका खासगी आश्रमशाळेतील मुलीला पळवून नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीये. या प्रकरणी तीन तरुणांसह एका शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

साक्रीततील सामोडे आश्रमशाळेतील मुलीला या पळवून नेण्यात आलं होतं. आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आले. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी शाळा प्रशासनानं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोप केलाय. पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडलं. नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडल्यानंतर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.

राज्यातील आश्रमशाळांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

- आश्रमशाळांतील मुलींची सुरक्षा कोण करणार?
– आश्रमशाळांतील मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?
– मुलींवरच्या वाढत्या अत्याचारांविरोधात सरकार कधी करणार ठोस कारवाई?
– मुजोर प्रशासनाला कधी आणि कसा लावणार चाप?

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close