नवी मुंबईतही दोन विद्यार्थ्याना H1N1ची लागण

August 11, 2009 10:29 AM0 commentsViews: 1

11 ऑगस्टनवी मुंबईत दोन विद्यार्थ्यांना H1N1 ची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर भीतीपोटी अनेकांनी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गर्दी केली होती. सर्दी, खोकला आणि ताप आलेल्या लोकांचा यात समावेश होता. दुपारी एक वाजेपर्यंत एकाच हॉस्पिटलमध्ये तब्बल चौदाशे लोकांनी गर्दी केली होती. नवी मुंबई पालिकेचे हॉस्पिटल, विभागीय माता बाल रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्रात तपासणी करण्यासाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारीही मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. ज्यांना H1N1 ची लागण झाल्याची शक्यता वाटतेय, त्यांना थेट कस्तुरबा रूग्णालयात पाठवण्यात येतंय, अशी माहीती पालिका आयुक्त विजय नहाटा यांनी दिली आहे.

close