पुण्यात H1N1चा पाचवा तर मुंबईत दुसरा बळी

August 11, 2009 10:36 AM0 commentsViews: 2

11 ऑगस्ट H1N1मुळे पुण्यात आणखी एक मृत्यु झाला आहे. त्यामुळे आता पुण्यातील H1N1च्या बळींची संख्या 5 झाली आहे. तर मुंबइतील आणखी महिलेचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्येही एक 13 वर्षाची मुलगी H1N1मुळे दगावली आहे. त्यामुळे आता देशात H1N1ने दगावलेल्याची संख्या दहा झाली आहे. पुण्यात मंगळवारी पहाटे श्रृती गावडे या 13 वर्षाच्या विद्यार्थिनीचा मध्यरात्री मृत्यू झाला. श्रृती पुण्यातल्या नारायण पेठेतल्या आहिल्यादेवी शाळेची विद्यार्थीनी होती. सुरवातीला तिला केईएममध्ये दाखल करण्यात आलं होतं. नंतर तिला ससूनमध्ये हालवण्यात आलं. तर अजूनही 6 पेशंट्सची प्रकृती गंभीर असल्याचं ससूनच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. यातल्या चार पेशंट्सना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. मुंबई भायखळ्याच्या नूर या खासगी हॉस्पिटलमध्ये सय्यदा या महिलेचा मृत्यू झाला आहे. 63 वर्षांची सय्यदा ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा इथली रहिवासी होती. त्यामुळे मुंबईतील बळींची संख्या दोन झाली आहे. गुजरातमध्ये बडोदा इथल्या एसएसजी हॉस्पिटलमध्ये आर्या मुरळे या 13 वर्षांच्या मुलीचा H1N1ची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. गुजरातमधला H1N1नं घेतलेला हा दुसरा बळी ठरला आहे.

close