आरोग्य सेवेचे तीन तेरा, महाराष्ट्राचे रुग्ण चालले तेलंगणाला !

December 25, 2014 9:59 PM0 commentsViews:

gadchiroli3425 डिसेंबर : आदिवासी भागात आरोग्य सेवा पुरविण्याचा दावा कसा फसवा असतो याचं मूर्तीमंद उदाहरण पाहण्यास मिळालं. रुग्णाला तात्काळ 108 या क्रमांकावर कॉल करताच रुग्णवाहिका उपलब्ध होण्याची योजना गडचिरोली जिल्ह्यात फसली आहे. तेलंगाणाच्या सीमेवर राज्याच शेवटच टोक असलेल्या सिरोंचात रुग्णवाहिका असून सुद्धा डॉक्टर नसल्यामुळे दोन बाळांना आपल्या आईसोबत उन्हात ताटकाळात उभा राहावं लागलं.
गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा या दुर्गम भागातल्या उपजिल्हा रूग्णालयात एक आदिवासी महिला आपल्या जुळ्या मुलांना उपचारासाठी घेऊन आली. ही मुलं अतिशय अशक्त असल्यानं त्यांना अलापल्ली इथं उपचारासाठी घेऊन जावं लागणार होतं. पण, तिला रुग्णवाहिका मिळालीच नाही. कारण रुग्णवाहिका आहे. पण, त्यावर डॉक्टर नाही. अखेर स्थानिकांनी दबाव आणला आणि वरिष्ठांशी संपर्क साधला तेव्हा कुठं रुग्णवाहिका उपलब्ध झाली. पेशंटनं 108 या क्रमांकावर फोन केल्यानंतर तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची राज्य सरकारची योजना आहे. या योजनेची गडचिरोलीत सर्वात जास्त गरज आहे. पण, महाराष्ट्राच्या सीमेवरच्या जिल्ह्यांमध्ये आरोग्यसेवेचं हे विदारक वास्तव आहे. धक्कादायक म्हणजे, तेलंगणाच्या सीमेवर असणार्‍या सिरोंचा तालुक्यातल्या नागरिकांना डॉक्टर नसल्याने महाराष्ट्राच्या 108 योजनेतील रुग्णवाहिका वापरता येत नाही. ही रुग्णवाहिका फक्त नदीपर्यंत नेता येते आणि होडीतून नदीपलिकडे रुग्णाला नेऊन तेलंगणाची 108 योजनेतील रुग्णवाहिका थेट तेलंगणाची राजधानी हैदराबाद पर्यंत रुग्णाला नेते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close