मुंबई-पुण्यात H1N1च्या उपचारासाठी खाजगी हॉस्पिटल्सना परवानगी

August 11, 2009 10:42 AM0 commentsViews: 4

11ऑगस्ट पुण्यातील ज्या खाजगी हॉस्पिटल्समध्ये ICU ची व्यवस्था आहे, अशा काही खाजगी हॉस्पिटल्सना H1N1 वर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली. या हॉस्पिटल्समध्ये नोबल हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, भारती विद्यापीठ हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, काशीबाई नवले हॉस्पिटलचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये निरामय हॉस्पिटल आणि लोकमान्य हॉस्पिटल मध्येही H1N1 वर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. H1N1 संदर्भातल्या गोळ्या सरकारच देईल, पण त्याची तपासणी सरकारी हॉस्पिटल्समध्येच करण्यात येईल. संशयीत रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी इथेच करण्यात येणार आहे.मुंबईतही सहा हॉस्पिटल्सना H1N1च्या उपचारांची परवानगी देण्यात आली आहे. त्यात विलेपार्ले मधील कूपर हॉस्पिटल, भाभा हॉस्पिटल, सांताक्रुझ मधलं व्ही. एन. देसाई हॉस्पिटल, पालिकेची हॉस्पिटल्स आहेत. तर मालाड मधलं एस. के. पाटील हॉस्पिटल, गोवंडी हॉस्पिटल आणि विक्रोळी मधलं कन्नमवारनगर हॉस्पिटल ही खासगी हॉस्पिटल्स आहेत.

close