वसई-विरार महानगरपालिकेला स्थगिती

August 11, 2009 12:03 PM0 commentsViews: 15

11 ऑगस्ट वसई-विरार महानगरपालिकेला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. वसई- विरार महानगरपालिकेत समावेश होण्यास 53 गावांनी विरोध केला होता. महानगरपालिकेला विरोध करण्यासाठी शिवसेना उपनेते विवेक पंडित यांनी सोमवार पासून वसईत उपोषण सुरू केलं होतं. तर आमदार हितेंद्रठाकूर यांनी महानगरपालिकेत गावांचा समावेश करण्यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावली होती. रविवारी रात्री वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर आणि पालघरचे खासदार बळीराम जाधव यांना काही संतप्त गावकर्‍यांनी मारहाण केली होती. त्यानंतर हितेंद्र ठाकूरांच्या गूंडांनी या भागात अक्षरशहा धूडगूस घातला होता. मुख्यमंत्र्यांच्या वतीने गृहराज्यमंत्री नितीन राऊत यांनी वसईत जाऊन महानगरपालिकेला स्थगिती दिल्याची घोषणा केली. सरकारने केलेल्या घोषणेचं जनतेने स्वागत केलं आहे. या निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विवेक पंडित यांनी दिला आहे.

close